
आपल्या साधेपणाने आणि उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री म्हणून मृणाल दुसानिसला ओळखले जाते. ती मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

मृणाल दुसानिस ही सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम! या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत ती नंदिनी मोहिते ही मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे.

मृणालने नुकताच तिच्या मुलीचा एक गोड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत तिने तिच्या गोड कुटुंबाची एक झलकही दाखवली आहे. 'My Banku…!! My funny bunny..!!, असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे.

मृणालच्या मुलीचे नाव नुरवी असे असून त्याचा अर्थ लक्ष्मी किंवा आशीर्वाद असा होतो. या फोटोत मृणाल आणि नीरजचे हसरे चेहरे पाहायला आहेत.

तसेच काही फोटोत त्यांनी त्याच्या लेकीच्या काही गोड क्षण पाहायला मिळत आहे. त्यासोबतच एका फोटोत ते आपल्या लेकीचा हात पकडून फोटो काढताना दिसत आहेत.

मृणाल सध्या अभिनयातून थोडासा ब्रेक घेऊन तिच्या आईपणाच्या खास क्षण अनुभवताना दिसत आहे.

२०१६ मध्ये नीरज मोरे यांच्याशी लग्न करून मृणाल अमेरिकेत स्थायिक झाली होती. त्यानंतर तिने काही वर्षांचा ब्रेक घेतला होता. मात्र आता तिने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन केले आहे.

सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम! या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत ती नंदिनी मोहिते ही मुख्य भूमिका साकारत आहे. सध्या या मालिकेतील तिचे पात्र सुपरहिट ठरताना दिसत आहे.

मृणालने याआधी 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'तू तिथे मी' आणि 'अस्सं सासर सुरेख बाई' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. या मालिकांमधून ती घराघरात पोहोचली.

(सर्व फोटो - मृणाल दुसानिस/ इन्स्टाग्राम)