लालबागच्या राजाचे विसर्जन तासाभरापासून खोळंबलं, गुजरातहून आणलेल्या तराफ्यामुळे खोळंबा

लालबागच्या राजाच्या विसर्जनात अडचणी निर्माण झाल्या आहेत. नवीन आणि मोठ्या तराफ्यावर मूर्ती चढवताना अनेक अडचणी येत आहेत. यामुळे विसर्जन विलंब झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मूर्तीवरील दागिने काढण्यात आले आहेत.

| Updated on: Sep 07, 2025 | 10:21 AM
1 / 8
 लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या वेळी एक अनपेक्षित अडथळा निर्माण झाला आहे.

2 / 8
lalbag raja

lalbag raja

3 / 8
गेल्या तासभरापासून लालबाग राजाचा बाप्पा गिरगावच्या किनारपट्टीवर ताटकळत असल्याचे चित्र दिसत आहे.

4 / 8
यावर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी गुजरातमध्ये एक अत्यंत अत्याधुनिक आणि मोठा तराफा बनवण्यात आला होता.

5 / 8
मात्र याच नव्या तराफ्यावर मूर्ती योग्य प्रकारे बसत नसल्याने विसर्जन रखडल्याचे पाहायला मिळत आहे.

6 / 8
सध्या सुरक्षेची खबरदारी म्हणून मूर्तीवरील सर्व मौल्यवान दागिने काढण्यात आले आहेत.

7 / 8
अनेक प्रयत्नांनंतरही या अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे राजाला निरोप देण्यासाठी उपस्थित असलेल्या गणेशभक्तांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

8 / 8
सध्या मंडळाचे कार्यकर्ते आणि प्रशासनाचे अधिकारी एकत्रितपणे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.