Lara Dutta Daughter: लारा दत्ताच्या लेकीची मोठी कामगिरी, गाजवलं टेनिस कोर्ट; चॅम्पियनशिप जिंकत आईवडिलांची मान उंचावली

Lara Dutta Daughter: 'रामायण' या चित्रपटातील कैकेयीच्या भूमिकेमुळे सध्या चर्चेत असलेल्या लारा दत्ताने नुकतेच सोशल मीडियावर तिच्या मुलीचे काही फोटो पोस्ट केले. लाराची मुलगी सायरा टेनिसच्या मैदानात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे.

| Updated on: Nov 19, 2026 | 8:13 AM
1 / 5
Lara Dutta: अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स लारा दत्ता सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. तिच्या मुलीने टेनिस स्पर्धेत दिमाखदार विजय मिळवत कुटुंबाची मान अभिमानाने उंचावली आहे. मुलगी सायरा भूपती हिच्या या यशामुळे लारा दत्ताचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. विशेष म्हणजे, मुलीच्या विजयाचा आनंद व्यक्त करताना लाराने तिच्या वाढत्या उंचीचाही गंमतीशीर उल्लेख केला आहे.

Lara Dutta: अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स लारा दत्ता सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. तिच्या मुलीने टेनिस स्पर्धेत दिमाखदार विजय मिळवत कुटुंबाची मान अभिमानाने उंचावली आहे. मुलगी सायरा भूपती हिच्या या यशामुळे लारा दत्ताचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. विशेष म्हणजे, मुलीच्या विजयाचा आनंद व्यक्त करताना लाराने तिच्या वाढत्या उंचीचाही गंमतीशीर उल्लेख केला आहे.

2 / 5

'माझ्यापेक्षाही आता उंच झाली आहे माझी छोटी मुलगी', असं म्हणत तिने मुलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. लारा दत्ता आणि प्रसिद्ध टेनिसपटू महेश भूपती यांची मुलगी सायरा हिने नुकत्याच पार पडलेल्या टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळवलं. संयुक्त अरब अमिरातीमधील फुजैरा इथल्या टेनिस अँड कंट्री क्लबमध्ये ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सायराने आपल्या खेळातील कौशल्य दाखवत चॅम्पियनशिपवर नाव कोरलं.

3 / 5

विजयानंतर सायराने ट्रॉफी आणि बक्षिसाची रक्कम असलेला धनादेश हातात घेतल्याचे फोटोही समोर आले आहेत. मुलीच्या या यशानंतर लारा दत्ताने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. यामध्ये सायरा टेनिस कोर्टवर खेळताना, हातात ट्रॉफी घेताना आणि आईसोबत मिरर सेल्फी घेताना दिसत आहे. मात्र, मुलीची खासगी ओळख जपण्यासाठी लाराने फोटोंमध्ये तिचा चेहरा इमोजीच्या मदतीने झाकला आहे.

4 / 5

हे फोटो शेअर करताना लाराने लिहिलं, 'माझ्यापेक्षाही उंच झालेल्या मुलीसोबत टूरला गेले होते आणि तिथून थेट विजय घेऊन परतले. खूप अभिमान वाटतोय.' लाराच्या या पोस्टवर चाहत्यांसह मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री दिया मिर्झा आणि तिस्का चोप्रा यांनीही सायराच्या यशाचं कौतुक केलं आहे.

5 / 5

सायरा भूपतीसाठी टेनिसमधील हे यश विशेष महत्त्वाचं आहे. कारण तिचे वडील महेश भूपती हे भारतातील दिग्गज टेनिसपटूंपैकी एक आहेत. त्यांनी पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरी प्रकारात मिळून तब्बल 12 ग्रँड स्लॅम विजेतेपदं पटकावली आहेत. 1997 मध्ये फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीचे विजेतेपद जिंकत त्यांनी भारतीय टेनिसमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली होती. लिअँडर पेससोबतची त्यांची जोडीही टेनिसविश्वात प्रचंड लोकप्रिय होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us