देशात सर्वाधिक आदिवासी कोणत्या राज्यात? तुमचा अंदाज नेमका चुकणार

Largest Tribal State in India: झारखंड, छत्तीसगडमध्ये सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आहे, असा तुमचा अंदाज असेल तर थोडाबहुत खरा आहे. पण या राज्यात सर्वाधिक आदिवासी राहतात. हे राज्य भारताच्या हृदयस्थानी आहे.

| Updated on: Dec 09, 2025 | 4:34 PM
1 / 6
तर विविध आदिवासी जमाती हे मध्यप्रदेशाचं खास वैशिष्ट्यं आहे. त्यांची कला, नृत्यू, सण, समारंभ, पंरपरा, सामाजिक जीवन हे राज्याला गौरव आणि सांस्कृतिक ठेवा देते. आगामी पिढ्या सुद्धा मोठ्या अभिमानाने हा वारसा चालवत आहेत. मध्यप्रदेशमध्ये सर्वाधिक आदिवासी राहतात.

2 / 6
गेल्या काही वर्षात विकास योजनांमुळे आदिवासी समाजात शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक स्थितीत मोठा बदल झाला आहे. आपल्या परंपरा, नृत्य, पोषाख, खाद्य संस्कृती जोपसतानाच आदिवासी समाजातील लोक आधुनिकतेचा पण स्वीकार करत आहे. त्यांच्या जीवनातही तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला आहे.

3 / 6
2011 मधील शिरगिणतीत मध्य प्रदेशच्या एकूण लोकसंख्येत 21 टक्क्यांहून अधिक संख्या अनुसूचित जमातींची होती. अनुसूचीत जमातींच्या लोकसंख्येत हे राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. या राज्यात विविध जमातींची लोकसंख्या आढळते.

4 / 6
मध्यप्रदेशमध्ये भील, गोंड, कोल, कोरकू, सहरिया आणि बैगा या प्रमुख जमाती आढळतात. यांची एकूण लोकसंख्या राज्याच्या एकूण 92 टक्के आदिवासी लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करते. इतरही मायक्रो आदिवासी जमाती या राज्यात आढळतात. मध्य प्रदेशाला महाराष्ट्राची सीमा असल्याने दोन्ही राज्यात हे आदिवासी सहज ये जा करतात.

5 / 6
आदिवासींच्या विकासासाठी सरकार अनेक योजना चालवते. पण आजही मुख्य रस्ते आणि पाणी यासाठी आदिवासी भागातील महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. शिधा मिळवण्यासाठी कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागते.

6 / 6
आदिवासी भागातील आरोग्य आणि कुपोषणाची समस्या अधिक गंभीर आहे. सदूर जंगलातील आदिवासी गर्भवती महिला, वृद्धांना आजही झोळीत टाकून आरोग्य केंद्रावर आणावे लागते. पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होते. विविध आजारांसाठी यांना आजही कित्येक मैल पायपीट करावी लागते.