हेच कारण होतं की स्वर कोकिळा लता मंगेशकरांनाही सहन करावं लागंल रिजेक्शन, प्रोड्युसरने थेट दिला होता नकार; म्हणाला…

लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजाने अनेक दशकं संगीतविश्वावर राज्य केलं. मात्र, कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांच्या याच आवाजाला नकारही मिळाला होता. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलेला हा किस्सा त्यांच्या संघर्षाची आणि मेहनतीची आठवण करून देतो.

| Updated on: Oct 05, 2026 | 3:08 PM
1 / 5
लता मंगेशकर यांनी वयाच्या 5व्या वर्षापासून गाण्याचे शिक्षण सुरू केले. त्यांचे वडील उत्तम शास्त्रीय गायक होते आणि त्यांची नाटक कंपनीही होती. लता यांनी सांगितले, “जेव्हा मी 5 वर्षांची होते तेव्हा त्यांनी मला गाताना ऐकलं आणि म्हटलं की तू शिक.”

लता मंगेशकर यांनी वयाच्या 5व्या वर्षापासून गाण्याचे शिक्षण सुरू केले. त्यांचे वडील उत्तम शास्त्रीय गायक होते आणि त्यांची नाटक कंपनीही होती. लता यांनी सांगितले, “जेव्हा मी 5 वर्षांची होते तेव्हा त्यांनी मला गाताना ऐकलं आणि म्हटलं की तू शिक.”

2 / 5

लता मंगेशकर कधीही नियमित शाळेत जाऊ शकल्या नाहीत. त्यांनी सांगितले, “मी स्कूल गई ही नहीं कभी, बस दो दिन गई थी। मैंने जो सीखा वो सब घर में सीखा।” वडिलांच्या निधनानंतर त्यांनी घरातच रियाज सुरू ठेवला.

3 / 5

कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांच्या पातळ आवाजामुळे त्यांना नकार मिळाला होता. एस. मुखर्जी यांनी त्यांचा आवाज ऐकून, “नहीं ये आवाज तो बहुत पतली है, मेरी हिरोइन को सूट नहीं करेगा,” असं म्हटलं होतं. मात्र, खेमचंद प्रकाश आणि अनिल बिस्वास यांनी त्यांच्यातील गुणवत्ता ओळखली.

4 / 5

लता मंगेशकर यांनी खेमचंद प्रकाश यांच्यासोबत ‘जिद्दी’ चित्रपटात काम केल्यानंतर ‘महल’मध्ये गाणं गायलं. या चित्रपटातील ‘आएगा आनेवाला’ हे गाणं त्यांच्या कारकिर्दीतील मोठं यश ठरलं. या गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यान त्यांना अनेक वेळा माइकपासून दूर जाऊन पुन्हा जवळ यावं लागलं.

5 / 5

लता यांनी सांगितले होते की, रेकॉर्डिंगच्या वेळी त्यांना वारंवार “ये ठीक नहीं हो रहा- फिर वापस जाओ..” असं सांगितलं जायचं. त्या काळात टेप रेकॉर्डिंगची सुविधा नव्हती आणि गाणी थेट फिल्मवर रेकॉर्ड केली जात होती. अनेक प्रयत्नांनंतर रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यावरच त्यांना दिलासा मिळाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us