
मराठी विश्वातील एक काळ ज्यांनी गाजवला त्याचं नाव म्हणजे अभिनेते महेश कोठारे... आजही 90 च्या दशकातील त्यांचे सिनेमे चाहते आवडीने पाहतात. महेश कोठारे यांनी नीलिमा कोठारे यांच्यासोबत लग्न केलं. त्यांना आदिनाथ हा मुलगा देखील आहे.

दिग्गज अभिनेते निळू फुले... यांचं नाव जरी समोर आलं, तरी त्यांचे गाजलेले डायलॉग आठवतात... निळू फुले यांनी रजनी फुले यांच्यासोबत लग्न केलं होतं. त्यांची लेक गार्गी फुले देखील सिनेविश्वात सक्रिय आहे.

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यात नसले तरी त्यांच्या असंख्य आठवणी आजही चाहत्यांच्या मनात कायम आहेत. त्यांनी प्रिया बेर्डे यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. त्यांनी अभिनय आणि स्वानंदी अशी दोन मुलं आहेत.

अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. दोघांचे जुने फोटो आणि व्हिडीओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांच्या मुलीचं नाव श्रिया असं असून ती देखील मनोरंजन विश्वात सक्रिय आहे.

दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर चाहत्यांना आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला. रवींद्र यांनी माधवी महाजनी यांच्यासोबत लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी मराठी आणि बॉलिवूडमध्ये देखील सक्रिय आहे.