
मल्टिपल स्क्लेरोसिस हा एक आजार आहे,ज्याचा थेट परिणाम हा आपल्या मज्जासंस्थेवर होतो. हा आजार थेट अनुवांशिक नाहीये. मात्र, याचे प्रमाण हे दिवसेंदविस वाढताना दिसत आहे.

ज्या लोकांचा मल्टिपल स्क्लेरोसिस असलेल्या व्यक्तीशी संबंध आहेत त्यांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. विशेष म्हणजे हा आजार अधिक महिलांमध्ये आढळून येतो.

मल्टिपल स्क्लेरोसिस असलेल्या व्यक्तीच्या भावांना आणि बहिणींना किंवा त्यांचा मुलांना देखील हा आजार होऊ शकतो. सध्याच्या स्थितीला हा आजार 100 पैकी तीन लोकांमध्ये आढळतो.

मल्टिपल स्क्लेरोसिस आजाराची प्रमुख लक्षणे ही हातपायांमध्ये कमकुवतपणा. हेच नाही तर काहींना चालण्यास देखील समस्या येतात. चालताना त्रास होतो.

बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर आणि हाता पायांवर सूज येते. योग्यवेळी आपण या आजारावर उपचार घेऊन ही समस्या कमी करू शकतो. दिवसेंदिवस हा मल्टिपल स्क्लेरोसिसचा आजार वाढताना दिसतोय.