
आजकाल महिला आपल्या पायावर उभ्या असून विविध क्षेत्रात महिला अव्वल ठिकाणी अजून मोठ्या पगाराच्या पदांवर काम करत आहेत. मात्र, लग्नानंतर महिलांच्या पगारावर अधिकार नेमका कोणाचा हा प्रश्न उपस्थित केला जातो.

अनेकदा महिलांकडून सासरच्या मंडळीकडून जबरदस्ती करून किंवा मारहाण करून महिलेचा पगार घेतला जातो. मात्र, महिलेची कमाई जबरदस्ती करून घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. कायद्यानुसार, महिलेचा तिच्या कमाईवर पूर्ण अधिकार आहे आणि कोणीही त्याचा गैरवापर करू शकत नाही किंवा जबरदस्ती करू शकत नाही.


1961 नुसार, पती किंवा सासरीची मंडळी जर हुंड्यांच्या नावाखाली महिलेची कमाई, पगार, मालमत्ता यासारख्या गोष्टींसाठी त्रास देत असेल तर हा कायदा लागू होतो. यामध्ये 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि मोठा दंड होऊ शकतो.

घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005 नुसार, जर पती किंवा सासरच्या लोकांनी एखाद्या महिलेच्या कमाईसाठी जबरदस्ती केली तर या कायद्याअंतर्गत तात्काळ तक्रार दाखल करता येते आणि जेलमध्येही सासरी मंडळी जाऊ शकते.