
शासकीय विमा कंपनी एलआयसी अशा काही खास योजना राबवते, ज्यांच्या मदतीने तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. विशेष म्हणजे या योजनांत पैसे बुडण्याचा अजिबात धोका नाही. या योजना कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या...

एलआयसी जीवन आनंद ही एक प्रसिद्ध अशी योजना आहे. तुम्ही या योजनेत रोज 45 रुपयांची गुंतवणूक म्हणजेच 1358 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 25 लाख रुपयांपर्यंत पैसे मिळू शकतात. या योजनेत कमीत कमी 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. योजनेची मॅच्यूरिटी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही गुंतवलेल्या पैशांसह तुम्हाला व्याजदेखील मिलते.

एलआयस जीवन शिरोमणी हीदेखील अशीच एक योजना आहे. ही एक प्रिमियम सुरक्षा कवच योजना आहे. तुम्हाला या योजनेत एक कोटी रुपयांपर्यंतचा फंड तयार करता येऊ शकतो. एलआयसी जीवन उमंग हीदेखील अशीच एक योजना आहे. या योजनेत प्रत्येक वर्षाला 8 टक्क्यांनी गॅरंटीड मनिबॅक पैसे मिळतात.

एलआयसी जीवन तरुण या योजनेत तुम्ही तुमच्या मुलांच्या भवितव्याची सोय करू शकता. या योजनेत मुलांचे वय 25 वर्षे होईपर्यंत गुंतवणूक करता येऊ शकते. जेव्हा मुलगा 20 ते 25 वर्षांचा होतो, त्यानंतर मुलाला प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम मिळते.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)