Mental Fitness : मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी ‘या’ गोष्टीचं सेवन कराच!

| Updated on: Oct 09, 2021 | 9:17 AM

व्यायाम, ध्यान आणि साधना या गोष्टींसोबतच मानसिक आरोग्यासाठी आपण सेवन करत असलेले अन्न देखील महत्त्वाची भूमीका बजावत असते. त्यामुळे निरोगी मानसिक आरोग्य मिळवण्यासाठी आहारात पुढील गोष्टींचा समावेश करा.

1 / 3
संत्रा या फळामध्ये मोठ्या प्रमाणात फ्लेव्होनॉइड्स असतात. संत्रांचे रोज सेवन केल्यानंतर त्याचा फायदा मेंदूच्या पेशींना होऊ शकते.

2 / 3
पालेभाज्या - अनेकदा आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करण्यास सांगितले जाते. ब्रोकोली, पालक सारख्या भाज्यामध्ये अनेक पोषकतत्व असतात. हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन के, बीटा-कॅरोटीन, फोलेट आणि ल्यूटिन असतात . हिरव्या पालेभाज्यांमध्ये असणारे घटक मेंदूला निरोगी ठेवण्यात मोठी भूमिका बजावतात.

3 / 3
माशांमध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड असते. या ओमेगा -3चे  आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. ओमेगा -3 पासून मिळणाऱ्या तत्वामुळे हृदयाच्या समस्यांपासून, त्वच्या आणि केसांच्या आरोग्यापर्यंत सर्वांना लाभ होतो. आठवड्यामध्ये दोन वेळा तुमच्या आहारात माशांचा समावेश करणे तुमच्या मेंदूच्या पेशींसाठी फायदेशीर ठरू शकते.