
परफ्यूम लावायला प्रत्येकालाच आवडते. विशेष म्हणजे अमूक परफ्यमूचा सुगंध त्या व्यक्तीची ओळख होऊन जाते. परफ्यूम लावताना मात्र अनेकजण चार मोठ्या चुका करतात. या चुका केल्यामुळे इतरांनाही त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे या चुका टाळल्या पाहिजेत.

अनेकजणांना परफ्यूम लावण्याची सवय असते. पण यातील अनेकजण प्रमाणापेक्षा जास्त परफ्यूम लावतात. सॉफ्ट आणि हलका सुगंध सर्वांना आवडतो. पण प्रमाणापेक्षा जास्त परफ्यूम लावल्याने समोरच्या व्यक्तीला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पल्स पॉइंट्सवर परफ्यूम लावावा.

अनेकजण स्ट्राँग परफ्यूम लावतात. काही परफ्यूम तर एवढे स्ट्राँग असतात की थोडाजरी लावला तरी त्याचा सुगंध सगळ्या घरात पोहोचतो. त्यामुळे अस स्टाँग परफ्यूम प्रमाणापेक्षा जास्त लावू नयेत. स्टाँग परफ्यूमचा तुमच्या बाजूच्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो.

अनेकजण सार्वजनिक ठिकाणी अंगावर पुन्हा एकदा परफ्यूम फासतात. पण असे करणे टाळले पाहिजे. कारण सार्वजनिक ठिकाणी परफ्यूम लावल्यास उपस्थितांमध्ये एखाद्या व्यक्तीला सुगंधाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे जास्त लोक नसलेल्या ठिकाणी जाऊन परफ्यूम अंगावर लावावा.

अनेकजण परफ्यूम आणि डिओड्रंट याचा सारखाच वापर करतात. परफ्यमून हा घामाचा वास लपवण्यासाठी नसतो. तुम्हाला खूप घाम येत असेल तर अगोदर डिओड्रंट लावावा आणि नंतर हलकासा परफ्यूम वापरावा. त्यामुळे परफ्यूमचा सुगंधही टिकेल आणि अंगाचा उग्र वासही येणार नाही.