
बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी दररोज रिकाम्या पोटी एक ग्लास गरम पाणी प्या. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.

रात्री 5-8 मनुके पाण्यात भिजत ठेवा. रोज सकाळी खा. यामुळे देखील बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यास मदत होते.

एक ग्लास गरम दुधात अर्धा चमचा तूप मिसळून प्या. यामुळे बद्धकोष्ठता दूर होते.

बद्धकोष्ठतेदरम्यान आपल्या दररोजच्या आहारामध्ये हिंगाचा समावेश करा.

बद्धकोष्ठतेचे मुख्य कारण म्हणजे कच्चे अन्न खाणे हे देखील आहे. यामुळे शक्यतो कच्चे अन्न खाणे टाळाच.