
हृदयाशी संबंधित आजारांना आपल्यापासून दूर ठेवण्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स महत्त्वाची भूमिका बजावतात. रोज दुपारी एक ग्लास अननसाचा रस प्यावा. यामुळे शरीराला व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात मिळते.

उन्हाळ्याच्या हंगाम वजन कमी करण्यासाठी चांगला मानला जातो. व्यायाम करणे किंवा धावणे याशिवाय आहाराची काळजी घेणेही गरजेचे आहे. अननसाचा रस प्यायल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते.

अननसाच्या रसाची आणखी एक खासियत म्हणजे तो रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यातही प्रभावी आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे.

अननसाचा रस हाडे मजबूत करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. अननसमध्ये मॅंगनीज आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. याचे सेवन केल्याने हाडेच नव्हे तर दातही मजबूत होतात.

ज्यांना अनेकदा पोटाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते ते अननसाचा रस पिऊन त्यांची पचनक्रिया मजबूत करू शकतात. यामध्ये असलेले फायबर पोटाचे आरोग्य राखण्यासाठी मदत होते.