
आजकाल चहा हा दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत चहा हे अत्यंत महत्त्वाचे पेय आहे. मात्र, ज्याप्रमाणे दैनंदिन जीवनातील काही सवयी अत्यंत हानिकारक असतात, त्याप्रमाणेच जास्त चहा पिणेही आरोग्यासाठी हानिकारक आहे.

बऱ्याच लोकांचा दिवस एक कप चहाशिवाय सुरू होत नाही. अनेकांना दिवसातून अनेक वेळा चहा पिण्याची सवय असते. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या चहाची चव घ्यायला आवडते.

ज्यांना चहा पिण्याची सवय असते त्यांचा मेंदू जास्त सक्रिय असतो. यूएस जर्नलच्या अभ्यासानुसार हे समोर आले आहे. मात्र, दिवसभरात जास्त चहा पिणे देखील आरोग्यासाठी धोकादायक आहे.

तज्ज्ञांच्या मते, चहामध्ये कॅफिन असते. त्यामुळे मेंदू अधिक सक्रिय होतो. त्यामुळे रोज चहा पिण्याची सवय असणाऱ्यांच्या मेंदूची कार्यक्षमताही वाढते.