
मानेवरील ताण दूर करण्यासाठी ही योगा पोझ फायदेशीर आहे. हे करण्यासाठी डोके उजवीकडे किंवा डावीकडे करा आणि नंतर डोक्याच्या वरच्या भागावर हात ठेवा. काही मिनिटे हे करा. आपला दुसरा हात कंबरेच्या मागे असावा.

संग्रहित छायाचित्र

शलभासन हे आसन केल्याने तुमचे स्नायू मजबूत होतात. हे अगदी सोपे आहे, कोणीही करू शकते. मान आणि कंबरेला ताण आल्याने त्यांचा त्रासही कमी होईल.

बालासन हे आसन रोज केल्याने मान आणि पाठदुखीपासून आराम मिळेल, तसेच मन शांत होते. मेंदूचे आरोग्य सुधारण्याचे काम करते. हे दिवसातून एकदा नक्की करा.

नटराजन आसन हे आसन केल्याने स्नायूंमध्ये लवचिकता येते आणि त्यामधील वेदनाही कमी होतात. हे आसन तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी वेळ मिळेल तेव्हा करू शकता.