Health care : दररोज लवंगचे पाणी प्यायल्याने शरीराला हे फायदे मिळतील, वाचा अधिक!

आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर सर्दी, ताप यासारख्या समस्या उन्हाळ्यातही आपल्याला होण्याची शक्यता असते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी दररोज लवंगाचे पाणी प्या. यातील खनिजे आणि जीवनसत्त्वे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. जर तुमच्या त्वचेवर डाग असतील तर तुम्ही ते लवंगच्या पाण्याने ते दूर करू शकता. यामध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म त्यांना दूर करण्यात प्रभावी मानले जातात.

| Edited By: | Updated on: Apr 10, 2022 | 6:30 AM
1 / 5
आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर सर्दी, ताप यासारख्या समस्या उन्हाळ्यातही आपल्याला होण्याची शक्यता असते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी दररोज लवंगाचे पाणी प्या. यातील खनिजे आणि जीवनसत्त्वे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर सर्दी, ताप यासारख्या समस्या उन्हाळ्यातही आपल्याला होण्याची शक्यता असते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी दररोज लवंगाचे पाणी प्या. यातील खनिजे आणि जीवनसत्त्वे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

2 / 5

जर तुमच्या त्वचेवर डाग असतील तर तुम्ही ते लवंगच्या पाण्याने ते दूर करू शकता. यामध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म त्यांना दूर करण्यात प्रभावी मानले जातात. पाणी रोज प्यायल्याने त्वचा आतून दुरुस्त होऊन चमकते.

3 / 5

अनेकांना शरीरात जळजळ होण्याची समस्या असते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असले तरी लवंगच्या पाण्याने शरीरातील सूज कमी करता येते. लवंगाचे पाणी प्यायल्याने सांधेदुखीचा त्रासही कमी होतो असे म्हणतात.

4 / 5

ज्या लोकांना मधुमेह आहे किंवा त्यांना स्वतःमध्ये त्याची लक्षणे दिसतात त्यांनी आजपासूनच लवंगचे पाणी पिण्यास सुरुवात करावी. तज्ज्ञांच्या मते, लवंग साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रभावी आहे.

5 / 5

जुन्या काळात दातांच्या समस्या दूर करण्यासाठी लवंगचा वापर केला जात असे. दातांमधून रक्त येत असेल किंवा तोंडातून घाण वास येत असेल लवंगच्या पाण्याने गुळण्या करा. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us