
उन्हाळ्यात मँगो शेक पिण्यावर सर्वांचाच भर असतो. मात्र, जास्त प्रमाणात मँगो शेक प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. आंब्यात गोडवा आणि आंबटपणा असतो, अशा वेळी त्यापासून बनवलेले शेक प्यायल्याने नुकसान होऊ शकते. जाणून घ्या त्यामुळे होणारे नुकसान.

डॉक्टरांच्या मते, जर तुम्ही मँगो शेक जास्त प्रमाणात प्यायले तर पोट खराब होऊ शकते. तुम्हाला अतिसार होऊ शकतो किंवा पोटात दुखू शकते. यामुळे जास्त प्रमामात मँगो शेक पिताना नक्कीच विचार करा.

बर्फ आणि थंड दुधाच्या साहाय्याने मँगो शेक तयार केला जातो. जास्त प्रमाणात मँगो शेक प्यायल्याने शरीराचे तापमान वाढू शकते. अशा परिस्थितीत मँगो शेक दिवसातून एकदाच प्या.

आंबा आणि दुधाच्या मिश्रणाने देखील त्वचेवर ऍलर्जी होऊ शकते. जर तुम्हाला आधीच ऍलर्जीची समस्या असेल तर मँगो शेक पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

आंब्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. तर दूध हे एक दुग्धजन्य पदार्थ आहे ज्यामध्ये चरबी जास्त असते. हे दोन सतत प्यायल्याने हळूहळू वजन वाढू लागते. यामुळे जे लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांनी मँगो शेकचे अजिबात सेवन करू नये.