
दुधामध्ये असलेले कॅल्शियम आणि इतर पोषक तत्व आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. केवळ लहान मुलेच नाही तर मोठ्यांनी देखील आपल्या दररोजच्या आहारामध्ये दुधाचा समावेश करायला हवा. मात्र, काही पदार्थाचे दूधासोबत सेवन करणे टाळले पाहिजे. हे पदार्थ नेमके कोणते याबद्दल आपण जाणून घेऊयात.

नाश्त्यात मुळ्याच्या भाजीसोबत पराठे खाल्ल्यानंतर लगेचच लोक दूध पितात. पण तज्ज्ञांच्या मते, असे करू नये. त्यामुळे त्वचेचे आजारही होऊ शकतात. मुळा खाल्ल्यानंतर सुमारे 2 तास तरी दूध पिणे टाळा.

उडदाची डाळ खाल्यानंतर लगेचच दूध पिणे टाळा. तज्ज्ञांच्या मते, यामुळे आपल्या शरीराला हानी होऊ शकते. उडीद डाळ दुधासोबत खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.

बऱ्याच लोकांना दूध पिताना खमंग पदार्थ खायला आवडते. मात्र, तसे करू नका. दूध पिताना कुठलेही तेलकट पदार्थ वगैरे खाऊ नका.

दुध पिताना कधीही आंबट फळे खाऊ नये. तसेच, केळीसह दुधाचे सेवन चांगले नाही. दूध आणि केळीचे एकत्र सेवन केल्याने कफाची समस्या निर्माण होते.