
EPFO आणि PF चे बेसिक नियम प्रत्येक पगारी कर्मचाऱ्याच्या बेसिक सॅलरीतून १२ टक्के रक्कम पीएफमध्ये जाते. कंपनीकडूनही तेवढेच योगदान दिले जाते. यात ८.३३ टक्के EPS म्हणजे पेन्शन फंडात जातो. हाच फंड निवृत्तीनंतर पेन्शन देत असतो.

नॉर्मल EPS पेन्शन 58 वर्षांच्या वयानंतर आणि कमीत कमी 10 वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर पेन्शन मिळते. 60 वर्षानंतर वाट पाहिल्यानंतर दरवर्षी 4 टक्के अतिरिक्त फायदा मिळू शकतो.

अर्ली पेन्शनचा पर्यायात 50 वर्षाच्या वयानंतर पेन्शन घेतली जाऊ शकते. परंतू 58 वर्षांच्या आधी पेन्शन घेतली तर दर वर्षी 4 टक्के पेन्शन कमी होत जाते. यामुळे निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागतो.

विकलांग आणि परिवार पेंशन सेवा प्रकारात अपंग झाल्यानंतर 10 वर्षांची सेवेची अट लागू होत नाही. सदस्याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी आणि 25 वर्षे वयाहून कमी दोन मुलांना पेन्शन मिळते.

अनाथ आणि नॉमिनी पेन्शन जर सदस्य आणि त्याच्या जीवनसाथी दोघांचाही मृत्यू झाला तर मुलांना 25 वर्षांपर्यंत पेन्शन मिळते. जर कुटुंबात कोणी नसेल तर नॉमिनी केलेल्यांना पेन्शन मिळते.

पेन्शनचा फॉर्म्युला काय आहे ? EPS पेन्शनचा फॉर्म्युला आहे एव्हरेज सॅलरी गुणिले पेन्शनेबल सर्व्हीस भाग 70. सरासरी पगारात बेसिक आणि डीएचा समावेश असतो. कमाल पेन्शनेबल सर्व्हीस 35 वर्षांची मानली जाते.