AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Boat Accident | भाजीपाला घेऊन परतताना काळाचा घाला! भाजी विक्रेत्यांची बोट गंगा नदीत उलटली, अन् जे झालं ते.....

Bihar Boat Accident | भाजीपाला घेऊन परतताना काळाचा घाला! भाजी विक्रेत्यांची बोट गंगा नदीत उलटली, अन् जे झालं ते…..

| Updated on: May 28, 2026 | 10:55 AM
Share

बिहारची राजधानी असलेल्या पाटणाजवळील गंगा नदीत गुरुवारी पहाटे भीषण बोट दुर्घटना घडली असून या अपघातात आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 ते 7 जण अद्याप बेपत्ता असल्याने शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. उमानाथ घाटाजवळ भाजीपाला घेऊन परतणारी बोट जोरदार वाऱ्यामुळे नदीच्या मध्यभागी उलटल्याने हा भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

बिहारची राजधानी असलेल्या पाटणाजवळील गंगा नदीत गुरुवारी पहाटे भीषण बोट दुर्घटना घडली असून या अपघातात आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 ते 7 जण अद्याप बेपत्ता असल्याने शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. उमानाथ घाटाजवळ भाजीपाला घेऊन परतणारी बोट जोरदार वाऱ्यामुळे नदीच्या मध्यभागी उलटल्याने हा भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बरह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मासूमगंज बिंद टोली येथील नागरिक रोजप्रमाणे गंगा नदीपलीकडील समस्तीपूर जिल्ह्यातील सुलतानपूर दियारा येथे शेतीच्या कामासाठी गेले होते. काम आटोपून हे नागरिक पहाटे भाजीपाल्याने भरलेल्या लहान बोटीतून उमानाथ घाटाकडे परतत होते. मात्र सकाळी साडेपाचच्या सुमारास नदीत अचानक जोरदार वारे सुरू झाले. त्यामुळे बोट नियंत्रणाबाहेर जाऊन एका बाजूला कलंडली आणि काही क्षणांतच खोल पाण्यात उलटली.
बोटीत सुमारे 15 ते 16 जण प्रवास करत होते. अपघातानंतर नदीत एकच आक्रोश पसरला. स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू करत अनेकांना बाहेर काढलं. आतापर्यंत 7 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आलं असून 3 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये लीला देवी (40), नीलम कुमारी (30) आणि काशी कुमार (15) यांचा समावेश आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून SDRF च्या पथकाकडून गंगा नदीत मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार 5 जण बेपत्ता आहेत, तर कुटुंबीयांनी 7 जणांचा शोध लागत नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Published on: May 28, 2026 10:55 AM

Follow Us
Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक.

Uddhav- Raj Thackeray: मोठी बातमी, NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार! 26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक

Raj Thackeray: दिल्लीतील मोर्चा सारखं आमच्या मोर्चात केलं तर फटकावून काढेल; राज ठाकरेंचा इशारा.

Raj Thackeray: दिल्लीतील मोर्चा सारखं आमच्या मोर्चात केलं तर फटकावून काढेल; राज ठाकरेंचा इशारा

मोठी बातमी! दिल्लीत इंटरनेट सेवा बंद, मोठा निर्णय, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान...

मोठी बातमी! दिल्लीत इंटरनेट सेवा बंद, मोठा निर्णय, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान..

Delhi Metro Stations : लंच पर्यंत बघतो, नाही तर मग..16 मेट्रो स्टेशन्स बंद, मुख्य न्यायाधीशांचं महत्वाचं वक्तव्य.

Delhi Metro Stations : लंच पर्यंत बघतो, नाही तर मग..16 मेट्रो स्टेशन्स बंद, मुख्य न्यायाधीशांचं महत्वाचं वक्तव्य

धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट...

धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट..

मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबईतील जलसाठ्यांमध्ये वाढ, चार धरणं ओव्हरफ्लो, उवर्रित धरणांची आकडेवारीही समोर.

मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबईतील जलसाठ्यांमध्ये वाढ, चार धरणं ओव्हरफ्लो, उवर्रित धरणांची आकडेवारीही समोर