AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबईतील जलसाठ्यांमध्ये वाढ, चार धरणं ओव्हरफ्लो, उवर्रित धरणांची आकडेवारीही समोर

मुंबईत पुन्हा एकदा पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे आता पाणीसाठ्यात वाढ होत आहे, आता मुंबईला पाणी पुरवणारे जी धरणं आहेत त्यातील चार धरणं ही ओव्हरफ्लॉ झाली आहेत.

मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबईतील जलसाठ्यांमध्ये वाढ, चार धरणं ओव्हरफ्लो, उवर्रित धरणांची आकडेवारीही समोर
| Updated on: Jul 23, 2026 | 12:09 PM
Share

मुंबईकरांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे . गेल्या काही दिवसांपासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. बुधवार, दिनांक 22 जुलै 2026 सकाळी 6 ते गुरुवार, दिनांक 23 जुलै 2026 सकाळी 6  या 24 तासात झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा साठा 69.74 % झाला आहे . गेल्या 24 तासात जलाशय साठ्यात 7.84 % वाढ झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या अधिकृत अहवालानुसार, तलावांमध्ये सातत्याने पाणी जमा होत आहे. असंच पाणीसाठा जमा होत राहिला तर पाणीकपात लवकरच  कमी होईल.

मुंबई पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणी पुरवणारे मुख्य दोन तलाव जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच ओसंडून वाहत आहेत. विहार तलाव आणि तुळशी तलाव हे दोन्ही तलाव ओसांडून वाहत आहे. यासोबतच आणखी दोन धरणं ही दुथडी भर वाहत आहे. 18 जुलै 2026 ला सात तलावांमध्ये 7 लाख 34 हजार 891 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता तर तो 20 जुलै 2026 रोजी 7 लाख 82 हजार 370 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. आता 22 जुलै, 2026 पर्यंत, एकूण पाणीसाठ 8 लाख 35 हजार 919 दशलक्ष लिटर झाला आहे, जो एकूण साठवण क्षमतेच्या 57.75% आहे. आता आज 23 जुलै 2026 रोजी 10 लाख 09 हजार 432 दशलक्ष लिटर झाला आहे. इतका पाऊस पडूनही मागील वर्षीच्या तुलनेत 18 टक्के पाणीसाठा कमीच झाला आहे.

याशिवाय, पाणी शुद्धीकरण केंद्र असलेल्या भांडुप संकुल परिसरात गेल्या 24 तासांत 52 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर या हंगामातील एकूण पर्जन्यमान आता 2116 मिमीवर पोहोचले आहे. हवामान खात्याने आगामी काही दिवसांतही पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवला असल्याने इतर प्रमुख धरणांमधील साठ्यातही वेगाने वाढ होण्याची अपेक्षा नाकारता येत नाही. आता कालपर्यंत विहार आणि तुळशी धरण ओव्हरफ्लो झालेले दिसले. आता मोडक सागर आणि तानसा हे धरण देखील ओव्हरफ्लो झाल्याची माहिती समोर आलेली आहे.

कोणत्या तलावात सध्या किती पाणीसाठा? 

  • अप्पर वैतरणा –1,12,187 ( 49.41%)
  • मोडक सागर – 1,28,925 (100%)
  • तानसा- 1,45,080 (100%)
  • मध्य वैतरणा- 1,21,379 (62.72%)
  • भातासा – 4,66,116 (65.01%)
  • विहार- 27,698 (100%)
  • तुळशी – 8,046 (100%)

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच