आता बस्सं! मी रखरखत्या उन्हात, जीवाची लाहीलाही होईपर्यंत… जरांगे पाटलांचं आमरण उपोषणाबाबत कठोर विधान
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद सुरू आहे. त्यांनी कडक आंदोलनाचा इशारा दिला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, यावेळी त्यांनी अत्यंत कठोर आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद सुरू आहे. त्यांनी कडक आंदोलनाचा इशारा दिला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, यावेळी त्यांनी अत्यंत कठोर आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
यावेळी जरांगे म्हणाले, “आपण सरकारला पाहिजे होता, त्यापेक्षा जास्त वेळ दिला आहे. उद्याच्या 29 मे रोजी 10 महिने पूर्ण होत आहेत. 29 ऑगस्टला मुंबईत गेलो होतो. त्याच धर्तीवर आतापर्यंत 10 महिने वेळ दिला. यापेक्षा किती वेळ द्यायचा? जाणूनबुजून गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांवर का अन्याय केला जातो? म्हणून मी कठोर भूमिका घेतली आहे. माझा नाइलाज आहे. मला कोणाला दोष द्यायचा नाही. आपल्या लेकरांना, समाजाला मिळत नसेल तर कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे. जे घोषित केलं होतं, 30 मे पासून आमरण उपोषण सुरू करणार आहे,” अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे.
पुढे जरांगे म्हणाले, ‘मी मंडपात किंवा सावलीत उपोषण करणार नाही. मी रखरखत्या उन्हात जीवाची लाहीलाही होईपर्यंत लढेन. तुमच्या लेकराबाळांसाठी मी जीव द्यायला तयार आहे. माझा निर्णय झाला आहे, हा बदलणार नाही.’
Published on: May 28, 2026 11:05 AM
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!

