
आपल्या सर्वांनाच राजमाची भाजी खाण्यासाठी प्रचंड आवडते. राजमा खाणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, काही लोकांनी राजमाचे सेवन करणे टाळलेच पाहिजे.

राजमा खाल्ल्यानंतर ते पचण्यासाठी शरीरात पाण्याचे प्रमाण जास्त असावे. जर तुम्ही पाणी कमी प्याल तर आपल्याला बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते.

राजमा लोहाचा एक उत्तम स्रोत मानला जातो आणि जर तुम्ही त्याचे जास्त प्रमाणात सेवन केले तर शरीरात लोहाचे प्रमाण वाढू शकते. अशावेळी राजमाचे सेवन मर्यादित प्रमाणात करा.

गरोदर महिलांनी राजमाचे सेवन टाळले पाहिजे. त्यामुळे गर्भवती महिलेच्या पोटात गॅसची समस्याही होऊ शकते. यामुळे बाळालाही त्रास होऊ शकतो.

ज्या लोकांना वजन कमी करण्याची समस्या आहे, त्यांनी राजमा कमी खावा. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते आणि ते जास्त खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)