
काकडी आरोग्याप्रमाणेच आपल्या त्वचेसाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे ते त्वचेच्या अनेक समस्याही दूर करते. किसलेल्या काकडीचा रस काढून कॉटन बॉलने चेहऱ्यावर लावा आणि वाळल्यावर चेहरा धुवा.

त्वचेची निगा राखण्यासाठी गुलाब पाणी फायदेशीर आहे. गुलाब पाण्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासही मदत होते. ते बाजारात सहज उपलब्ध मिळते. जेव्हा जेव्हा तुम्हाला चेहऱ्यावर ताण जाणवेल तेव्हा चेहऱ्यावर स्प्रे करा.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ग्रीन टी त्वचेची काळजी घेण्यासाठी देखील वापरली जाऊ शकते. ग्रीन टीचे टोनर बनवा आणि त्वचेला लावा. रात्री झोपण्यापूर्वी हे टोनर नक्की लावा. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतील.

दही आणि स्ट्रॉबेरी हे दोन्ही घटक त्वचेची काळजी घेण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात. हे मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा टवटवीत राहते आणि ती जास्त काळ हायड्रेटही राहते. एका भांड्यात दोन ते तीन स्ट्रॉबेरी मॅश करा आणि त्यात एक चमचा दही घाला आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा.

शरीराला हायड्रेट ठेवणारे कलिंगड त्वचेतील आर्द्रताही टिकवून ठेवते. कलिंगड मॅश करा आणि त्याचा रस काढा आणि स्प्रेच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. कलिंगडमध्ये असलेले घटक त्वचेला निरोगी बनवतात. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या)