
उन्हाळ्यात टॅनिंगची समस्या अतिशय सामान्य असते. हानिकारक किरणांमुळे त्वचा टॅन होते. त्यामुळे त्वचेचे खूप नुकसान होते. उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. या दरम्यान केवळ चेहऱ्यावरच नव्हे तर हातांवरही भरपूर टॅन होतो. टॅनिंगची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायही करू शकता.

1 चमचा दही, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा तांदळाचे पीठ मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या हातांवर लावा आणि चांगला मसाज करा. यामुळे हातांची टॅनिंग दूर होते. हा उपाय आपण आठ दिवसांतून दोनदा करायला हवा.

कॉफी, अर्धा चमचा मध आणि अर्धा चमचा दूध मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या हातांवर लावून चांगला समाज करा. यामुळे आपल्या हातांवरील टॅन जाण्यास मदत होते. मसाज झाल्यावर थंड पाण्याने हात धुवा.

पपईचा लगदा एक चमचा घ्या आणि त्यामध्ये दूध मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट संपूर्ण हातांवर वीस मिनिटे ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने आपले हात धुवा. यामुळे हातांवरील टॅन दूर होण्यास मदत होईल.

एक कप दही घ्या आणि त्यात चिमूटभर हळद मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट संपूर्ण हातांवर लावा. त्यानंतर मसाज करा आणि स्वच्छ पाण्याने आपले हात धुवा. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)