
हेअर ड्रायरच्या वापरामुळे केसांचे मोठे नुकसान होते. केस निर्जीव झाले की तुटायला लागतात. खराब झालेल्या केसांचे पोषण करणे आवश्यक आहे. केसांचे पोषण करण्यासाठी आपण नेहमीच घरगुती उपाय करायला हवेत.

दही हे कंडिशनर म्हणून काम करते. केस मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी केसांवर दही आणि मधाचा मास्क लावा. यासाठी एका भांड्यात दही घ्या आणि त्यात एक चमचा मध मिसळा आणि केसांना लावा.

कोरफड हे केवळ केसांसाठीच नाही तर त्वचा आणि आरोग्यासाठीही फायदेशीर मानली जाते. यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वांचे गुणधर्म केसांचे पोषण करू शकतात. यासाठी कोरफड केसांना लावावी लागेल.

अंड्यांचा पॅक केसांचे पोषण करण्यासाठी तुम्ही अंडी वापरू शकता. अंड्यातील प्रोटीनमुळे केसांची वाढ चांगली होते. अंड्यात जवसाची पेस्ट मिसळा आणि केसांना लावा आणि नंतर शॅम्पू करा.

केसांमधील कोरडेपणा दूर करण्यासाठी केळी मॅश करून त्यात खोबरेल तेल घाला. आता ही पेस्ट केसांना लावा आणि कोरडे राहू द्या. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)