
केसांच्या वाढीशी तेलाचा थेट संबंध नाही. पण केसांना योग्य प्रकारे तेल लावल्यास केसांचा कोरडेपणा टाळता येऊ शकतो.

तेल लावल्याने टाळूमध्ये रक्ताभिसरण सुधारते. केसांच्या मुळाशी असलेले क्यूटिकल मजबूत केल्याने केस गळती थांबण्यास मदत होते.

आठ दिवसातून किमान एकदातरी आपल्या केसांना तेल लावले पाहिजे. मात्र, केसांच्या मुळांना जास्त तेल लावू नका.

अनेक जण रात्री तेलाने मसाज करून झोपतात. सकाळी शैम्पू करतात. परंतु बहुतेक सौंदर्य तज्ञ असे करू नका म्हणतात. शैम्पू करण्याच्या 1 तास अगोदर केसांना तेल लावले पाहिजे.