
हिवाळ्यात बहुतेकांना त्वचेची आणि केसांची समस्या निर्माण होते. तसेच कोरडेपणामुळे कोंड्याची देखील समस्या होते. कोंडा दूर करण्यासाठी बाजारात अनेक सौंदर्य उत्पादने उपलब्ध आहेत. पण ते रसायनांनी भरलेले असतात. त्याचा जास्त वापर तुमच्या केसांना हानी पोहोचवू शकतो. यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत.

काही वाळलेल्या कडुलिंबाची पाने आणि 4 चमचे ऑलिव्ह ऑईल मिक्स करा. कडुलिंबाची पाने पेस्ट होईपर्यंत तासभर उकळवा. ते तुमच्या टाळूवर लावा आणि 30 मिनिटे राहू द्या. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

केस गळण्याची समस्या

टी ट्री ऑइल खाज सुटण्याची समस्या दूर करते आणि कोंडा दूर करण्यास मदत करते. तुम्ही ते आठवड्यातून एकदा वापरू शकता. यासाठी टी ट्री ऑइलचे काही थेंब घ्या. तुमच्या नेहमीच्या शॅम्पूमध्ये टी ट्री ऑइलचे काही थेंब टाकून ते अँटी-डँड्रफ शैम्पू बनवा. यामुळे कोंडा दूर होण्यास मदत होईल.

दह्यामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड डोक्यातील कोंडा दूर करण्यास मदत करते. तसेच केस मुळापासून मजबूत होतात. यासाठी आवश्यकतेनुसार दही घ्या. हलक्या हातांनी 4 मिनिटे मसाज करा. त्यानंतर 10 ते 15 मिनिटे तसेच राहू द्या. काही वेळाने कोमट पाण्याने धुवा.(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)