
लहान वयात केस पांढरे होण्याची समस्या/प्रातिनिधिक छायाचित्र

केसांमध्ये कोरडेपणा : केसांमध्ये कोरडेपणा आल्यास अनेक समस्यांचा सामना कारवा लागतो, केसांची चमक संपून जाते. यासाठी आवळ्याचा रस टाळूला लावण्याचा सल्ला दिला जातो. आवळ्याचा रस टाळूला लावल्यास तो केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतो आणि केसांचे पोषण होते. केसांचा कोरडेपणा दूर होतो.

केस गळणे : आजकाल वाढत्या प्रदूषणामुळे केस गळणे सामान्य झाले आहे. आवळ्यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी शरीरातील अँटी ऑक्सिडंट वाढवते. आवळा पावडर मिसळून खोबरेल तेल लावल्याने केसांना चांगले पोषण मिळते आणि केस गळणे कमी होतात.

कोंडा : हिवाळ्यात केसांमध्ये ओलावा कमी होऊन केस कोरडे बनतात. केस कोरडे झाल्याने कोंड्यासारख्या समस्या निर्माण होतात. केसात कोंडा झाल्याने खाज सुटते. मात्र तुम्ही जर आवळ्याची पूड करून ती खोबरेल तेलात मिसळवली आणि हे खोबरेल तेल नियमितपणे डोक्याला लावले तर तुम्हाला कोंड्यापासून आराम मिळू शकतो.

तेलकट केस : अनेकांना हिवाळ्यात तेलकटपणाची समस्या जाणवते. केस तेलकट झाल्याचे भासतात. ही अतिरिक्त तेलाची समस्या देखील आवळ्याच्या वापराने दूर होऊ शकते. आवळा पाण्यात उकळला आणि हे उकळलेले पाणी थंड झाल्यानंतर डोक्याला नियमित लावले तर केसांचा तेलकटपणा कमी होतो. टीप वरील माहिती ही सामान्य ज्ञानाच्या हेतूने देण्यात आली आहे. तुम्ही कुठलेही औषधोपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.