
बेकिंग सोडा अंडरआर्म्स हलके करण्यास मदत करतो. जाड पेस्ट बनवण्यासाठी बेकिंग सोडा पाण्यात मिक्स करा. आता ही पेस्ट तुमच्या अंडरआर्म्सवर लावा आणि अंडरआर्म्सला स्क्रब करा. स्क्रबिंग केल्यानंतर धुवा.

खोबरेल तेलामध्ये व्हिटॅमिन ई असते. त्वचेसाठी हे खूप फायदेशीर आहे. नारळाच्या तेलाने दररोज अंडरआर्म्सची मालिश करा. पंधरा मिनिटे राहू द्या.

अॅपल सायडर व्हिनेगर केवळ चरबी कमी करत नाही तर मृतपेशी देखील काढून टाकते. कारण त्यात सौम्य अॅसिड असतात. बेकिंग सोडामध्ये 2 चमचे अॅपल सायडर व्हिनेगर मिक्स करा आणि अंडरआर्म्सवर लावा. दहा मिनिटांनी पाण्याने धुवा.

एक चमचा ऑलिव्ह ऑइलमध्ये एक चमचा ब्राऊन शुगर मिसळा. तुमचे होममेड एक्सफोलिएटर तयार आहे. दोन मिनिटे ते स्क्रब करा आणि नंतर काही मिनिट्यांनी पाण्याने धुवा.

लिंबू हे नैसर्गिक ब्लीचिंग एजंट मानले जाते. आंघोळीपूर्वी लिंबू रोज अंडरआर्म्सवर लावा आणि दोन-तीन मिनिटे चोळा यामुळे चांगला फरक पडेल.