
उन्हाळ्यात त्वचेची टॅन दूर करण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारे घरगुती फेसपॅक वापरू शकता. हे तुमची त्वचा हायड्रेटेड आणि निरोगी ठेवण्यास मदत करेल. हे फेसपॅक तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्या जसे की टॅन, रॅशेस आणि त्वचेचा लालसरपणा यापासून आराम देईल. यामुळेच हे फेसपॅक उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.

पुदिना आणि मुलतानी माती फेसपॅक आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे घरी तयार करण्यासाठी दोन चमचे मुलतानी माती आणि पुदिन्याच्या पानांची चांगली पेस्ट तयार करून घ्या. हा फेसपॅक चेहरा आणि मानेला लावा. ते कोरडे होईपर्यंत तसेच राहू द्या. त्यानंतर ते धुवा.

दही आणि कलिंगड फेसपॅक देखील या हंगामामध्ये त्वचेसाठी फायदेशीर आहे. कलिंगडची बारीक पेस्ट दोन चमचे आणि दही दोन चमचे चांगले मिक्स करून घ्या. त्यानंतर ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर धुवा. हे सनबर्नची समस्या दूर करते.

केळी आणि संत्री फेसपॅक चेहऱ्यावरील टॅन काढण्यास मदत करतो. हा फेसपॅक तयार करण्यासाठी 1 चमचा संत्र्याचा रस आणि केळी मिक्स करून काट्याने मॅश करा. आता ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटांनी आपला चेहरा थंड पाण्याने धुवा.

दही आणि मध देखील त्वचेसाठी फायदेशीर ठरते. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी दोन चमचे मध आणि तीन चमचे दही मिक्स करून घ्या आणि याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. थोड्यावेळाने आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)