
चिया बियामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करतात. त्यात खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. ते कोलेजनच्या निर्मितीमध्ये देखील मदत करतात.

स्ट्रॉबेरी किंवा ब्लूबेरी सारख्या बेरी देखील आपल्याला चमकदार त्वचा देऊ शकतात. ते आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात. सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही स्ट्रॉबेरीचा समावेश करू शकता. स्ट्रॉबेरी बारीक रेषा आणि सुरकुत्या देखील कमी करण्यास मदत करते.

बदामामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. जे त्वचेला उन्हापासून होणाऱ्या नुकसानापासून वाचवते. तसेच बदामामुळे आपली त्वचा हायड्रेटेड राहते. दररोज सकाळी बदामाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या देखील दूर होण्यास मदत होते.

मासे आपल्या शरीरासाठी आणि त्वचेसाठी खूप चांगले आहेत. आपली त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी ओमेगा 3 आणि पोषक तत्त्वे आवश्यक आहेत. साल्मन, सार्डिन सारखे मासे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.

पालेभाज्या हे सर्वात महत्वाचे अन्न आहे. ते अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे समृद्ध असते. पालक, ब्रोकोली, शेपू, कोथिंबीर त्वचेसाठी फायदेशीर आहे. विशेष म्हणजे कोथिंबीर त्वचा चमकदार बनवण्यासाठी मदत करतात.