
उन्हाळ्याच्या हंगामात आपण आपल्या आरोग्याची जेवढी काळजी जास्त घेऊ तेवढे ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यादरम्यान हेल्दी पेय आणि सकस आहार आपण घेतला पाहिजे. कारण उन्हाळ्याच्या हंगामात आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. फक्त हेल्दी पेय आहारात घेऊन आपण निरोगी राहणार नाहीतर यासाठी आपल्याला आहारामध्ये मोड आलेल्या काही कडधान्याचा देखील आहारामध्ये समावेश करावा लागेल.

निरोगी राहण्यासाठी हेल्दी ब्रेकफास्ट खूप महत्वाचा आहे. यासाठी ब्रेकफास्टमध्ये ड्रायफ्रुट्स आणि मोड आलेल्या कडधान्याचा समावेश करा. यामध्ये आपण मडकी, मूग, हिरवा वाटाणा, राजमा, चने यांचा समावेश करू शकतो.

ब्रेकफास्टमध्ये अंडी आणि दुधाचा समावेश करणे आवश्यक आहे. अंडी आपल्याला दिवसभर ऊर्जा देतात. अंड्यांमध्ये एमिनो अॅसिड मुबलक प्रमाणात असते. दुधात कॅल्शियम आणि प्रथिने असतात. त्यात प्रोटीन, सोडियम, फोलेट, सेलेनियम, कॅल्शियम देखील असते.

मोड आलेल्या कडधान्यामध्ये आपण भोपळा, ब्रोकोली आणि काकडी मिक्स करून खाऊ शकतो. यामुळे डिहायड्रेशनची समस्या दूर होईल. या सर्व भाज्यांमध्ये भरपूर पाणी आणि पोटॅशियम असते. तसेच मोड आलेल्या कडधान्यामध्ये प्रोटीन चांगले असते.

तुमच्या आहारात पुरेसे जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील घ्या. यामुळे पेशींना ऊर्जा मिळेल, त्यामुळे चयापचय चांगले होईल. तसेच ज्यांना आपले वाढलेले वजन कमी करायचे आहे, त्यांनी तर मोड आलेली कडधान्य दररोज आहारामध्ये घेतली पाहिजेत.