
फायबरयुक्त केळीचे सेवन आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाते. तज्ज्ञांच्या मते केळी शरीरात फायबरचे प्रमाण भरून गॅसची समस्या दूर करते. यामुळे केळीचा रोजच्या आहारामध्ये समावेश केल्याने पोटासंदर्भातील समस्या दूर होण्यास मदत होते.

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळेही गॅस किंवा अॅसिडिटी होऊ शकते. अशा स्थितीत तुम्ही कलिंगडचे सेवन नक्कीच करायला हवे. कलिंगड काळे मीठ टाकून खाल्ल्याने पोटात गॅस होत नाही. उन्हाळ्यात दिवसातून एकदा कलिंगडचे सेवन करा.

अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांचा उत्तम स्रोत मानला जाणारा किवी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी हे गुणकारी मानले जाते.

असं म्हणतात की काकडीत 96 टक्के पाणी असते आणि ते रोज सेवन केल्याने पोटाशी संबंधित आजार दूर राहतात. काकडी खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो आणि फायबरची कमतरताही दूर होते.

तज्ज्ञांच्या मते स्ट्रॉबेरीचे सेवन केल्याने पोटात गॅसची समस्या होत नाही. स्ट्रॉबेरीमध्ये नैसर्गिक साखर असते आणि त्यात असलेले फायबर पचनसंस्था मजबूत करते. दिवसातून एकदा याचे सेवन केल्याने अन्न पचन होण्यास मदत होते.