
बीट आणि गाजर शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. हिवाळी बाजारात या दोन्ही भाज्या मुबलक प्रमाणात मिळतात. त्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. आणि म्हणून हिवाळ्याच्या हंगामात गाजर आणि बीटच्या रसाचा आपल्या आहारात समावेश करा.

काकडी त्वचेची आर्द्रता राखण्यास मदत करते. काकडीत एस्कॉर्बिक ऍसिड देखील असते जे त्वचेला आतून चांगले ठेवते. यामुळे या हंगामात आहारामध्ये काकडीच्या रसाचा समावेश करा.

टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. टोमॅटो त्वचेच्या सुरकुत्या कमी करण्यास मदत करते . तसेच रोज एक ग्लास टोमॅटोचा रस प्यायल्यास त्वचा आतून स्वच्छ राहते.

दररोज सकाळी एक ग्लास तरी पपईचा रस प्यायला पाहिजे. हे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेसीर आहे.