
शरीरामध्ये कोलेस्टेरॉल नेहमी मर्यादेत असणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जेव्हा शरीरात खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते, तेंव्हा आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवायला हवे. अनेकांना असे वाटते की अंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतात.

अंडी हा पोषणाचा स्रोत आहे. अंडी खाण्याचे आरोग्यदायी फायदेही आहेत. अंड्यांमध्ये प्रथिने आणि अमीनो ऍसिड असतात. अभ्यास सांगतात की अंडी हृदयविकाराचा धोका अजिबात वाढवत नाहीत. अंडी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास देखील मदत करतात.

अंड्यांमध्ये चांगले कोलेस्ट्रॉल असते. जे आपल्या हृदयासाठी चांगले असते. पण केक, प्रक्रिया केलेले पदार्थ, मासे-मांस दुधात मिसळलेली अंडी शरीरासाठी चांगली नसतात आणि त्यामुळे वजनही वाढते. कारण अंडी अन्नावर ऑक्सिडायझेशन करतात आणि रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल तयार होते.

विशेष म्हणजे वजन कमी करण्यासाठीही अंडी फायदेशीर मानली जातात. उकडलेल्या अंड्यांमुळे वजन कमी होण्यासही मदत होते. वजन कमी करण्यासाठी आपण दररोज सकाळी तीन अंडी खाणे फायदेशीर आगे. मात्र, अंड्यातील पिवळा बलक काढा.

ज्यांना कोणाला कोलेस्ट्रॉलची समस्या आहे, अशांनी अंड्यातील पिवळ्या बलकचे सेवन करणे टाळले पाहिजे. बऱ्याच लोकांना अडी खाल्ल्यानंतर अंगाला खाज किंवा अॅलर्जी होते, अशांनी अंड्याचे सेवन करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या.