
बदामा असो वा बदामाचे तेल...दोन्ही आपल्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहे. उन्हाळ्यात या तेलाची मसाज केल्याने तुम्हाला आराम वाटू शकतो, त्याचप्रमाणे यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई केस दाट आणि चमकदार बनवते. यामुळे आठवड्यातून दोनदा बदाम तेलाने केसांची मालिश नक्कीच करा.

ऑलिव्ह ऑईल आरोग्याबरोबरच केसांसाठीही फायदेशीर मानते जाते. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये ऑलिव्ह ऑईलने केसांची मालिश करा.

त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी खोबरेल तेल अत्यंत फायदेशीर आहे. खोबरेल तेलाने केसांची मालिश केल्याने डोके थंड होते.

एवोकॅडो तेल हे व्हिटॅमिन बी, ए, डी आणि ई भरपूर प्रमाणात असते आणि ते धूळ आणि प्रदूषणापासून केसांचे संरक्षण करण्यास मदत करते. केसांना शॅम्पूने मसाज केल्याने केसांना अनेक फायदे मिळतात.

जोजोबा तेल या तेलाने डोक्याला मसाज केल्याने तुम्हाला आराम तर मिळेल. पण केस कोरडे आणि निर्जीव होण्यापासूनही वाचतील. यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म केसांना अनेक समस्यांपासून वाचवतात. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)