
हिवाळ्याच्या थंडगार वातावरणात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्याच्या हंगामात गुळाचा आहारात समावेश करणे अत्यंत फायदेशीर आहे. विशेष म्हणजे जर आपण गुळासोबत तिळाचे देखील सेवन केले तर सर्दी, खोकला आणि फ्लूसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

या हंगामात जर तुम्हाला वारंवार ताप येत असेल तर तुम्ही सुंठ आणि गुळाचे सेवन केले पाहिजे. यामुळे ताप येण्याची समस्या दूर होते.

तोंडातून दुर्गंधी येत असेल तर गूळ आणि बडीशेप एकत्र करून खावे. यामुळे दुर्गंधीची समस्या दूर होण्यास मदत होते.

हिवाळ्याच्या हंगामात निरोगी राहण्यासाठी आपण खास गूळ आणि डिंकाच्या लाडूचे सेवन दररोज सकाळी केले पाहिजे. हे हाडांसाठी खूप चांगले मानले जाते. टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या