
लिंबू: लोकांना असे वाटते की कॉफी आणि लिंबू यांचे मिश्रण गोरे करण्यासाठी सर्वोत्तम आहे. पण तज्ज्ञांच्या मते हे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे त्वचेवर पुरळ आणि कोरडेपणा येऊ शकतो.

बेकिंग सोडा: कॉफी आणि बेकिंग सोडा एकत्र त्वचेवर लावू नये. कारण बेकिंग सोडा त्वचेला खूप नुकसान करू शकतो.

टूथपेस्ट : आजकाल लोकांना चेहऱ्यावर टूथपेस्ट लावायला आवडते. पण चुकूनही ते कॉफीमध्ये मिसळू नये. यामुळे आपली त्वचा अधिक खराब होऊ शकते.

मीठ: कॉफी आणि मीठ यांचे मिश्रण देखील त्वचेसाठी हानिकारक आहे. मिठामुळे त्वचेवर खाज सुटणे किंवा पुरळ उठू शकते. तज्ज्ञांच्या मते, याचे स्क्रब चेहऱ्यावर अजिबात करू नये.