
चेहऱ्यावर जर ओपन पोर्स असतील तर त्यामुळे तुमच्या चेहरा खराब दिसतो. चेहऱ्यावर तेज दिसत नाही. दिवसेंदिवस ही समस्या वाढत चालली आहे. त्यावर आम्ही काही खास उपाय तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

चेहऱ्यावरील ओपन पोर्ससाठी मध प्रचंड गुणकारी आहे. मुलतानी माती, मध आणि गुलाबपाणी हे तिन्ही एकत्र करून पॅक तयार करा. तो ओपन पोर्स असणाऱ्या भागावर लावा. तुम्हाला फरक जाणवेल.

दहीदेखील ओपन पोर्सवर परिणामकारक आहे. दही अॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. यामुळे ओपन पोर्स निर्माण होणाऱ्या जंतूंवर परिणामकारक आहे. त्यामुळे ओपन पोर्स कमी होण्यास मदत होते.

मुलतानी मातीही ओपन पोर्स कमी करण्यात परिणामकारक आहे. मुलतानी माती सर्वाधिक प्रभावशाली आहे. मुलतानी माती ओपन पोर्समधूल ऑईल बाहेर काढून चेहऱ्यावर तेज आणते. याचा फेसपॅक बनवून चेहऱ्याला लावल्यास चेहरा सुंदर दिसतो.

ओपन पोर्सवर कोणताही उपाय करण्याआधी चेहरा स्वच्छ धुवा. कोणताही फेसपॅक हा आठवड्यातून एकदाच वापरा. मास्क काढताना थंड पाण्याने चेहरा धुवा. पण आपल्या चेहऱ्यावर काहीही वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.