
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, कलिंगड असो किंवा खरबूज असो. हे दोन्हीही आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. खरबूज आपले शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करते. यामुळे सध्याच्या हंगामामध्ये आहारामध्ये मोठ्या प्रमाणात खरबूजचा समावेश केला जातो.

खरबूज व्हिटॅमिन A आणि इतर अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का की याचे अनेक सौंदर्य फायदे देखील आहेत. याचा वापर करून त्वचेला हायड्रेट ठेवता येते. तर जाणून घेऊयात आपल्या त्वचेसाठी खरबूज किती जास्त फायदेशीर आहे.

खरबुजचा वापर क्लिन्झर म्हणून केला जाऊ शकतो. एक भांडे घ्या आणि त्यात खरबूज मॅश करा. हातांनी चेहऱ्यावर लावा आणि हळू हळू मसाज करा, हे आठवड्यातून दोनदा करा. काही दिवसात तुम्हाला तुमच्या त्वचेवर फरक दिसू लागेल.

एक भांडे घ्या आणि त्यात खरबूज मॅश करा आणि आता त्यात थोडे ग्लिसरीन टाका हे ओठांवर लावा. थोडा वेळ मसाज केल्यानंतर कोरडे राहू द्या. यामुळे आपले ओठ मुलायमदार होण्यास मदत होते. हे आपण दररोज केले तरीही हे फायदेशीर आहे.

खरबूज आणि गुलाब पाण्यापासून बनवलेले टोनर त्वचेसाठी फायदेशीर आहे. यासाठी एका भांड्यात खरबुजाचा रस काढून त्यात थोडे गुलाबपाणी मिसळा. रात्री झोपण्यापूर्वी हे त्वचेवर लावा. यामुळे आपली त्वचा तजेलदार होण्यास मदत होते. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)