
मोहरीचे तेल आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मोहरीच्या तेलाला सरसोचे तेल असेही म्हटंले जाते. मोहरीच्या तेलाचा उपयोग हा सर्वात जास्त खाद्यपदार्थ बनविण्यासाठी करण्यात येतो. हे आपल्याला माहीती आहे. मात्र, हे मोहरीचे तेल आपल्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.

मोहरीचे तेल हे सांधेदुखी, हाडांचे दुखणे, मांसपेशी दुखत असतील तर त्यावर अतिशय गुणकारी ठरते. नियमित स्वरूपात मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास, शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि हाडांचे दुखणे अथवा सांधेदुखी थांबण्यास मदत मिळते.

मोहरीच्या बियांनी त्वसेस चकाकी येते. मोहरीच्या त्वचा ग्लोईंग करता येते. मोहरीचे तेल त्वचेस तरूण राखण्यास मदत करते. ड्राय स्किन असल्यास मोहरीच्या बीया चांगला उपाय मानला जातो. मोहरीच्या बियांमध्ये सल्फर तसेच, अँटी फंगल हे घटक असल्याने चेहऱ्यावर होणाऱ्या इनफेक्शनला दूर ठेवण्यासाठी लाभदायक ठरते.

केसांना आणि स्काल्पसाठी मोहरीचे तेल अतिशय फायदेशीर ठरते. मोहरीचे तेल लावल्यास, केसांची वाढ आणि विकास होण्यास मदत होते. मोहरीच्या तेलातील मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, ओमेगा-3, ओमेगा – 6 फॅटी अॅसिडचा उपयोग केसांची वाढण्यासाठी होतो.