
ब्लीचिंग करताना विशेष काळजी घेतली पाहिजे. विशेष: ब्लीचिंग करण्याच्या अगोदर काळजी घेतली पाहिजे. असे न केल्यास चेहऱ्यावर मुरुम किंवा पुरळ येऊ शकतात.

अनेकदा लोक ब्लीच करण्यापूर्वी चेहऱ्यावर स्क्रब करतात. तज्ञांच्या मते, या पद्धतीमुळे त्वचेवर मुरुम आणि इतर समस्या उद्भवू शकतात.

अधिक अमोनिया मिसळल्याने चेहऱ्याचा रंग अधिक येतो. ब्लीचसाठी दिलेला अमोनिया निर्देशानुसार वापरला पाहिजे. तसेच ब्लीच लावल्यानंतर जर आपल्या त्वचेला त्रास होत असेल तर लगेचच आपल्या चेहरा पाण्याने धुवा.

असेही दिसून आले आहे की, ब्लीचचे मिश्रण बनवल्यानंतर लोक ते थेट चेहऱ्यावर लावतात. हे अजिबात करू नये. आधी पॅच टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. हे मिश्रण हातावर किंवा पायावर लावल्याने तुम्हाला कळेल की आपल्या त्वचेला याचा काही त्रास वगैरे होणार नाही.

जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मेकअप केला असेल आणि तुम्ही ब्लीच करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. तज्ञांच्या मते, चेहऱ्यावरील मेकअप असताना कधीही ब्लीच करू नये.