
फेशियल वॅक्सिंग करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करायला कधीही विसरू नका. यासाठी तुम्ही क्लींजरची मदत घेऊ शकता. जर तुमच्याकडे क्लींजर नसेल तर चेहरा स्वच्छ करण्यासाठी फेसवॉशचाही वापर केला जाऊ शकतो. तसेच आपण यासाठी गुलाब पाण्याची देखील मदत देऊ शकता.

चेहरा स्वच्छ केल्यानंतर स्क्रब करायला विसरू नका. चेहऱ्यावर साचलेली घाण आणखी चांगल्या प्रकारे साफ केली जाईल. स्क्रबिंग केल्यानंतर चेहरा पुन्हा एकदा थंड पाण्याने धुवा. मात्र, जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या असेल तर स्क्रबिंग करणे टाळाच.

चेहऱ्यावर, पायांवर आणि हातांवरही वॅक्स लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे खूप चांगले आहे. असे केल्याने, वॅक्सचा काहीही परिणाम आपल्या त्वचेवर होणार नाही हे आपल्याला समजेल.

तुम्ही चेहऱ्यावर देखील वॅक्सिंग करू शकता आणि हे केल्यानंतर चेहऱ्याला क्रीमने नक्कीच मसाज करा. असे केल्याने त्वचा कोरडी होत नाही आणि त्यामुळे कोणतेही नुकसान होत नाही.

फेशियल वॅक्सिंग केल्यानंतर त्यादिवशी स्वयंपाक करणे टाळालच. तसेच उन्हामध्ये आणि धुळीमध्ये देखील जाऊ नका.