
जास्वंदाच्या फुलाचे तेल केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर आहे. हे तेल केसगळती थांबवते आणि केसांना आतून मजबूत करण्यास मदत करते.

कांद्याचा रस देखील आपल्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कांद्याच्या रसामध्ये खोबरेल तेल मिक्स करून केसांना लावल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

दोन ते तीन आवळे खोबरेल तेलामध्ये टाकून गॅसवर वीस मिनिटे ठेवा. त्यानंतर हे तेल आपल्या केसांवर लावल्याने केस गळतीची समस्या कमी होण्यास मदत होते.

आवळ्याच्या रस आणि ग्रीन टीचे पाणी मिक्स करून केसांना लावणे देखील खूप फायदेशीर आहे. यामुळे केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)