
अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये ऍसिटिक ऍसिड असते. हे रंगद्रव्य आणि गडद डाग हलके करण्यास मदत करते. एका भांड्यात अॅपल सायडर व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील काळे कमी होतील.

त्वचेवरील काळे डाग हलके करण्यास कोरफड फायदेशीर आहे. हे पिगमेंटेशन उपचार म्हणून प्रभावीपणे कार्य करते. रात्री झोपण्याच्या अगोदर कोरफड त्वचेला लावा आणि सकाळी चेहरा थंड पाण्याने धुवा.

ग्रीन टी आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. ग्रीन टीमुळे आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्स दूर होण्यास मदत मिळते.

काळे डाग हलके करण्यासाठी तुम्ही बटाट्याचाही वापर करू शकता. यासाठी बटाटा कापून काळ्या डागांवर ठेवा. ते काही मिनिटे राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)