
आपल्याला कुठेही जायचे म्हटंले की, रस्त्याचा वापर करावा लागतो. युरोपमधील नेदरलँड्समध्ये एक असे गाव आहे, जिथे रस्ते नाहीत. या गावाचे नाव गिथॉर्न (Giethoorn) असे आहे. हे एक अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे.

गिथॉर्न गावामध्ये अतिशय रमणीय वातावरण आहे. स्थानिक लोक येथे प्रवास करण्यासाठी छोट्या बोटींचा वापर करतात. हे गाव खूप सुंदर आहे.

गिथॉर्न हे वेरबिनबेन-विडेन राष्ट्रीय उद्यानाच्या मध्यभागी स्थित गाव आहे. या गावाचे निसर्ग अतिशय बघण्यासारखे आहे.

विशेष म्हणजे या गावात रस्ते नसल्यामुळे लोकांना वाहने वगैरे वापरता येत नाहीत, त्यामुळे येथे प्रदूषण होत नाही.

गिथॉर्न अॅमस्टरडॅमच्या ईशान्येस सुमारे 55 स्थित आहे आणि सुमारे 180 पूल आहेत. सर्व लोक येथे पुलावरूनच ये-जा येतात.