
जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल आणि निरोगी राहायचे असेल तर रात्रीचे जेवण वेळेत आणि 7 च्या अगोदर करणे खूप महत्वाचे आहे.

बरेच लोक वजन कमी करण्यासाठी रात्रीचे जेवण करणे टाळतात. मात्र, असे करणे चुकीचे आहे.

जर तुम्ही दिवसातून फक्त दोन वेळा जेवण करायचे ठरवले असेल तर मध्यंतरी काहीतरी पाैष्टीक खाणे खूप महत्वाचे आहे.

जेवताना टीव्ही पाहणे किंवा मोबाईल फोन वापरणे टाळा. अन्न नेहमीच चावून खाल्ले पाहिजे.

रात्रीचे सेवन नेहमी थोडेच घेतले पाहिजे आणि रात्रीच्या जेवणामध्ये हलके अन्न असावे.