
कलिंगड खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये बाजारामध्ये कलिंगड आपल्याला सहज मिळते. कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते आणि कॅलरीज खूपच कमी असतात. यामुळे या हंगामामध्ये निरोगी राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारामध्ये कलिंगडचा समावेश नक्कीच करा.

तुम्हाला जे जाणून आर्श्चय वाटेल की, फक्त कलिंगडच नव्हेतर कलिंगडचा बिया देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. कलिंगडच्या बियांमध्ये तांबे, लोह, जस्त, मॅंगनीज भरपूर प्रमाणात असते. यामुळे कलिंगडसोबत कलिंगडच्या बिया खाणे देखील फायदेशीर आहे.

कलिंगडमध्ये भरपूर पाणी असते. गरम हवामानात शरीराची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी कलिंगड खूप चांगले काम करते. विशेष म्हणजे ते पचनासही मदत करते. कलिंगडमुळे शरीरातील ऊर्जाही टिकून राहण्यास मदत होते. यामुळेच आपल्या दररोजच्या आहारामध्ये नक्कीच कलिंगड समावेश करा.

जे लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी आपल्या दररोजच्या आहारामध्ये कलिंगडचा समावेश करायला हवा. कलिंगडमुळे आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होते.

कलिंगडमध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियम असते. जे आपल्या रक्तातील यूरिक ऍसिडचे प्रमाण नियंत्रित करते. तसेच किडनीच्या समस्यांपासून दूर राहते. यामुळे कलिंगड आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. उन्हाळ्याच्या हंगामात कलिंगडचा आहारात समावेश करा आणि निरोगी राहा.