Health Tips : झोपताना पायात सॉक्स घालण्याची चुक करताय? जाणून घ्या शरीराला नेमकं काय काय होऊ शकतं!

रात्री झोपताना पायात सॉक्स घालावेत का? असे विचारले जाते. अनेकजण थंडी लागू नये म्हणून सर्रास पायात सॉक्स घालतात. लहान मुलांच्याही पायात सॉक्स हमखास घातले जातात.

Updated on: Oct 12, 2025 | 9:44 PM
1 / 6
दिवसभर धापवळ केल्यानंतर रात्री शांत झोप लागावी असे प्रत्येकालाच वाटते. त्यासाठी अनेकजण वेगवेगळे फंडे वापरतात. काही लोक तर झोपण्यापूर्वी पायात सॉक्स घालून झोपतात.

2 / 6
थंडीच्या काळात अनेकजण पायात सॉक्स घालून झोपी जातात. पायांना थंडी लागू नये म्हणून हा उपाय सुचवला जातो. मात्र पायात सॉक्स घालून झोपणे खरंच योग्य आहे की अयोग्य याचा कधी तुम्ही विचार केला आहे का?

3 / 6
पायात सॉक्स घालून झोपी गेल्यास तुमच्या शरीराचे तापमान वाढू शकते. मोजे घातल्याने पायांना घाम येऊ शकतो. यामुळे पायांचा घान वास यायला लागतो.

4 / 6
रात्रभर पायात सॉक्स घातल्याने तुम्हाला फंगल इन्फेक्शन होण्याचीही शक्यता असते. पायावर रॅशेसही होऊ शकतात. तुम्ही पायात खट्ट सॉक्स घालून झोपण्याचा प्रयत्न केला तर पायातील रक्तप्रवाहदेखील बाधित होऊ शकतो.

5 / 6
त्यामुळेच रात्री झोपताना शक्यतो पायात सॉक्स घालू नये असे सांगितले जाते. मात्र तुम्हाला जास्तच थंडी वाजत असेल तर योग्य काळजी घेऊन सॉक्स घातले पाहिजेत.

6 / 6
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)